Pune Dam Storage Update: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराजवळील धरणे भरली, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज, नागरिकांना नदीपात्र न उतरण्याचा सल्ला

नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Wikimedia Commons)

Pune Dam Storage Update: पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९%, पानशेत १००%, वरसगाव १००% आणि टेमघर १००% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण १००% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. आज २४/०९/२०२४ ते २९/०९/२०२४ या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.

उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात न उतरण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: PM Modi to Inaugurate Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी करणार PCMC-Swargate मेट्रो लाईनवरील भूमिगत मार्गाचे उद्घाटन)

पुणेकरांना सतर्कतेचा इशारा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)