Pune Accident: पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकने दिली अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू (Watch Video)
घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आज पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवरील कोंढवा स्मशानभूमीजवळ सकाळी भीषण अपघात झाला. उतारावर सिमेंट पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कोंढवा-कात्रज रस्ता इथल्या अपघातामुळे कात्रज नेहमीच चर्चेत राहतो. कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. अचानक ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने, उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या कार, स्कूल व्हॅन आणि दुचाकीला धडक देत तो पुढे सरकत गेला. (हेही वाचा: Pune: विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याने शिक्षकाने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आली धक्कादायक माहिती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)