IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई

पूजा खेडकरने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप करत  यूपीएसीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली आहे. त्याशिवाय भविष्यातही  परीक्षा देण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Puja Khedkar | FIle Image

IAS Pooja Khedkar:  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) अखेर दोषी ठरली आहे. UPSC ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर हिला भविष्यातही लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आलं आहे. यूपीएससीने पूजा खेडकरला 31 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. त्याचे उत्तर न मिळाल्याने  ही कारवाई केली आहे. त्यामुळे पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला. यूपीएससीने आता पूजा खेडकरचे पद काढून घेतले असून  भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now