Piyush Goyal: नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी करा, एकनाथ शिंदे यांची केंद्राला विनंती

त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला विनंती केली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

पाठिमागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने पडत आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियूश गोयल यांना म्हटले आहे की, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) द्वारे करावी.

ट्विट