Prakash Amte पुन्हा पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये दाखल; भेटण्याचा आग्रह टाळण्याची अनिकेत आमटे यांची सोशल मीडीयातून विनंती
प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले आहे पण हा कर्करोग बरा होण्याजोगा असल्याचं त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरू केले जाणार आहेत. पण अनिकेत आमटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांंना पुन्हा ताप आल्याने आणि मागील काही दिवसांत इंफेक्शन पुन्हा वाढल्याने डॉक्टर उपचार करत आहेत. सध्या व्हिजिटर्स प्रवेश पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यासाठी आग्रह करू नये. प्रकाश आमटे ठीक झाल्यानंतर हेमलकसा मध्ये नागरिकांना भेटतील तेव्हा भेट घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी नातवंडांची भेट घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)