Prakash Ambedkar hospitalised: अँड. प्रकाश आंबेडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

Prakash Ambedkar hospitalised: अँड. प्रकाश आंबेडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल
Prakash Ambedkar | (Photo credit: archived, edited, representative image)

Prakash Ambedkar Health Update: वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना छातीत दुखू (Chest Pain) लागल्याने गुरुवारी (31 ऑक्टोबर) पहाटे पुणे (Pune) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळल्यामुळे त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे मात्र, त्यांच्या हृदयाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर अँजिओग्राफी (Angiography) शस्त्रक्रिया करु शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. आंबेडकर यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाने सध्या माध्यमांपासून अलिप्तता बाळगली आहे. त्यामुळे याबाबत कुटुंबीयांकडून विस्तृत माहिती मिळू शकली नाही.

पक्षाच्या वंचित बहुजन आघाडी या अधिकृत एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर पुढील 3-5 दिवस निरीक्षणाखाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकरांना पूर्ण आराम मिळेपर्यंत पक्षाची जबाबदारी व्हीबीएच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्याकडे तात्पूरत्या स्वरुपातअसेल. निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या पाठिंब्याने ठाकूर आंबेडकरांच्या पुनर्प्राप्ती कालावधीत वंबआचे नेतृत्व करतील.

वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्वक कोणाकडे?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).