Police Kills 12 Naxals In Encounter: गडचिरोली येथे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस व नक्षल्यांमध्ये मोठी चकमक; 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, अनेक शस्त्रे जप्त
आतापर्यंत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाला यश मिळाले आहे. यावेळी एक पीएसआय व एक पोलीस जवान जखमी झाला. ते दोघेही धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.
Police Kills 12 Naxals In Encounter: आज महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकेरजवळ पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक उडाली. यामध्ये आतापर्यंत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाला यश मिळाले आहे. यावेळी एक पीएसआय व एक पोलीस जवान जखमी झाला. ते दोघेही धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ तो अधूनमधून सुरू होता. आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत, तसेच तीन AK47, दोन INSAS, एक कार्बाइन, एक SLR यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षातील हे सर्वात मोठे ऑपरेशन असल्याचे समजले जात आहे. (हेही वाचा: Boy Drowns In Rainwater Filled Pit: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; Uttan येथील धक्कादायक घटना)
पहा पोस्ट-