PM Narendra Modi Metro Travel: पीएम नरेंद्र मोदींनी केला मुंबई मेट्रोमधून प्रवास; साधला नागरिकांशी संवाद (Watch Video)

पीएम मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनची पाहणी केली व मुंबई मेट्रोमधूनही प्रवास केला. पीएम मोदींनी गुंदवली ते मोगरापाडा असा मेट्रो प्रवास केला.

PM Narendra Modi Metro Travel

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज शहरात मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांसह अनेक प्रकल्प आणि विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी पंतप्रधानांनी गुंदवली मेट्रो स्टेशनवर ‘मुंबई वन' हे विशेष ॲप सादर केले. मेट्रो तिकीट ऑनलाइन काढण्यासाठीचे हे विशेष ॲप आहे. यासह मेट्रो तिकीट काढण्यासाठी राष्ट्रीय समान वाहतूक कार्डदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सादर केले. त्यानंतर पीएम मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनची पाहणी केली व मुंबई मेट्रोमधूनही प्रवास केला. पीएम मोदींनी गुंदवली ते मोगरापाडा असा मेट्रो प्रवास केला. या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी जनतेशी तसेच एमएमआरडीए च्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement