Pimpri Chinchwad: 50 पेक्षा जास्त महिलांना लग्नाचे आमिष दाखवून 1 कोटीहून अधिक रुपयांना घातला गंडा; व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक

लग्नाचे आमिष दाखवून 50 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली

लग्नाचे आमिष दाखवून फसवले (Photo Credit : ANI)

लग्नाचे आमिष दाखवून 50 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. याबाबत माहिती देताना कृष्णा प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी सांगितले, त्यांच्याकडे 2 महिलांकडून तक्रारी आल्या होत्या. ज्यांनी आरोप केला होता की एका पुरुषाने त्यांची 14 लाख आणि 20,000 रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध चेन्नईमध्ये एका महिलेसोबत 98 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याने 50 हून अधिक महिलांची फसवणूक केली होती. आता या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement