‘गद्दारांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा केलेला नीच आणि निर्लज्ज प्रकार जनता सहन करणार नाही’- Aaditya Thackeray
निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
नुकताच निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटद्वारे त्यांनी म्हटले आहे, ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)