लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार दंडाची कारवाई; औरंगाबाद आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय औरंगाबाद आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे

COVID19 vaccination | (Photo Credits: ANI)

लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय औरंगाबाद आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही, अशा नागरिकांनी उद्या 15 डिसेंबरपर्यंत लस न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

ज्या नागरिकांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही, किंवा दुसऱ्या मात्रेची तारीख उलटून गेल्यावरही दुसरी मात्रा घेतलेली नाही, अशा नागरिकांना आता पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement