Vasai Road रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनखाली पडण्यापासून प्रवाशांनी महिलेला वाचवले; काळजाचा ठोका चुकवणारी घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

काल वसई रोड रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनखाली पडण्यापासून एका महिलेला वाचवण्यात प्रवाशांना यश आले. ट्रेन सुरु असताना या महिलेने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.

Passengers saved a woman from falling under a moving train at Vasai Road Railway Station (Photo Credits: ANI)

काल वसई रोड रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनखाली पडण्यापासून एका महिलेला वाचवण्यात प्रवाशांना यश आले. ट्रेन सुरु असताना या महिलेने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा तोल जावून ती प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी तिच्यासोबत असलेले दोघेजण गोंधळून गेले. प्लॅटफॉर्मवर असलेले प्रवासी आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला सुखरुप बाहेर काढले. दरम्यान ही ट्रेनही थांबवण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पहा व्हिडिओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now