Mumbai Airport वर 70 कोटींचे ड्रग्ज जप्त, एका विदेशी नागरिकाला अटक
या प्रकरणात त्याला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती आदिस अबाबाहून मुंबई विमानतळावर दाखल झाला होता.
मुंबईच्या विमानतळावरून (Mumbai Airport ) ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. डीआरआयच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. डिआरआयने (Directorate of Revenue Intelligence) मुंबई विमानतळावर मोठा ड्रग्जचा (Drugs) साठा जप्त केला आहे. डीआरआयने एका विदेशी नागरिकाकडून 70 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणात त्याला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती आदिस अबाबाहून (Addis Ababa) मुंबई विमानतळावर दाखल झाला होता. त्याच्याकडे तब्बल 9.97 किलो ड्रग्ज सापडले आहे.बॅगेच्या आतमध्ये असलेल्या पोकळीत त्यांने हे ड्रग्ज लपवले होते.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)