Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा; जाणून घ्या ठिकाणे व दर
बूम बॅरियर्स, काँक्रीट फ्लोअरिंग, लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा देणारी ही पार्किंग सुविधा लवकरच लोकांसाठी खुली केली जाईल.
Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC), संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, स्वारगेट, आयडियल कॉलनी आणि मंगळवार पेठ/आरटीओसह आठ पुणे मेट्रो स्थानकांवर आता पार्किंगची जागा उपलब्ध होणार आहे. या पार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही गाड्या पार्क होऊ शकतात. पार्किंग सुविधेचे व्यवस्थापन आणि ऑपरेशनल बाबींवर नियुक्त एजन्सीद्वारे दैनंदिन आधारावर देखरेख केली जाणार आहे. बूम बॅरियर्स, काँक्रीट फ्लोअरिंग, लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा देणारी ही पार्किंग सुविधा लवकरच लोकांसाठी खुली केली जाईल. याशिवाय, ॲप-सक्षम पार्किंग बुकिंग आणि पार्किंग ऑक्युपन्सी डिस्प्ले माहिती फलक सोयीसाठी प्रदान केले आहेत. मेट्रोच्या कामकाजाच्या वेळेत हे पार्किंग उपलब्ध असेल. लाइन-1 (पर्पल लाईन) आणि लाईन-2 (अक्वा लाईन) वरील सेवांसाठी पुणे मेट्रोने त्याच दिवशी जारी केलेले वैध मेट्रो तिकीट धारण करणाऱ्या वापरकर्त्यांना, संबंधित मेट्रो स्टेशनवर पार्किंगमध्ये 25% सवलत मिळेल. वैध मेट्रो प्रवास पास असलेल्या वापरकर्त्यांसाठी मासिक पार्किंग सदस्यता पास देखील उपलब्ध आहेत. शिवाय, पार्किंगच्या जागेत हेल्मेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी 24 तासांसाठी 5 रुपये नाममात्र शुल्क लागू आहे. (हेही वाचा: Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)
पहा ठिकाणे व दर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)