Chandrapur: हल्लेखोरांची दहशत, दुकानात गोळीबार करून पेट्रोल बॉम्ब फेकला, चंद्रपूर येथील धक्कादायक घटना (Watch Video)

चंद्रपूर जिल्ह्यात एका दुकानात गोळीबार आणि पेट्रॉल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी ७ जुलै रोजी घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

chandrapur PC TW

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात एका दुकानात गोळीबार आणि पेट्रॉल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी 7 जुलै रोजी घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीन तरुण चेहऱ्यावर रुमाल बांधून दुकानात घुसले. दुकानात आत नासधुस करत दोन राऊंड गोळीबार केला आणि पेट्रोल बॉम्ब फेकले. बॉम्बमुळे दुकानाला आग लागली. गोळीबाराचा आवाज ऐकताच, काऊंटरवर बसलेला दुकानादार स्वत:चा बचाव करण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेला. दुकानाला आग लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहे. दुकानावर हल्ला का केला हे अद्याप समोर आले नाही.  (हेही वाचा- नाशिक मध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट दरीत; थरारक प्रकार कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement