Palghar Lynching Case: पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास सीबीआय करणार, महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

2020 मध्ये या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी दोन याचिका प्रलंबित होत्या. त्याला आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने विरोध केला होता.

Supreme Court

Palghar Lynching Case महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास महाराष्ट्र सरकार सीबीआयकडे (CBI) सोपवणार आहे. राज्य सरकारने ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court Of India) दिली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बंद केली. 2020 मध्ये या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी दोन याचिका प्रलंबित होत्या. त्याला आधीच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने विरोध केला होता. आता नवीन शिंदे सरकारने (Shinde Govt.) तपास सीबीआयकडे सोपवण्याचे सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now