Oxygen Tank Leaks at Nashik: नाशिक येथील ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास होणार; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत
आज नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे
आज नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणाचा तपास होणार असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सात जणांचा उच्चस्तरीय समितीत समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.