OBC Reservation: ओबीसी प्रवर्गाला 27 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकार ठाम; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बीएमसी आणि इतर संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत
ओबीसी प्रवर्गाला 27 टक्के आरक्षण देण्याबाबतच्या मागणीवर राज्य सरकार ठाम आहे. मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बीएमसी आणि इतर संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, प्रलंबित संस्थांच्या निवडणुकांची तारीख 2 आठवड्यात जाहीर करावी. ओबीसी आरक्षण मंजूर झाल्यानंतरच या निवडणूका घेण्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते.
#ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याबाबतच्या मागणीवर राज्य सरकार ठाम. मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती @CMOMaharashtra @ChhaganCBhujbal @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/BmOjOqYFqw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 11:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

