NMMC Revokes Water Cuts: धरणाची पातळी वाढल्याने नवी मुंबईमधील पाणी कपात रद्द; येत्या 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू
जूनच्या मध्यापर्यंत धरणाची क्षमता केवळ 26% होती.
NMMC Revokes Water Cuts: नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पातळी पूर्ण क्षमतेच्या जवळपास 74% पर्यंत वाढल्यामुळे आता पाणी कपात होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे. येत्या 29 जुलै पासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू होणार आहे. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 2400 मिमी पाऊस झाला. पाणीपुरवठ्यावर मर्यादा घालणे आता आवश्यक नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरुवातीला, जूनमध्ये कमी पाऊस आणि कमी होणारा साठा यामुळे पाणीकपात लागू करण्यात आली होती. जूनच्या मध्यापर्यंत धरणाची क्षमता केवळ 26% होती. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीकपात झाली, ती वाढून आठवड्यातून दोनदा झाली. आता मोरबे धरण 88 मीटरने ओव्हरफ्लो झाले आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; 15 ऑगस्टपासून सुरु होणार वाटप)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)