Nidhi Choudhari यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती; राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात महाविकास आघाडी भागीदारांशी मतभेद झाल्यानंतर, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची संचालक आयटी (IT) म्हणून बदली केली होती. मात्र अवघ्या दोनच दिवसात त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे
महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात महाविकास आघाडी भागीदारांशी मतभेद झाल्यानंतर, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची संचालक आयटी (IT) म्हणून बदली केली होती. मात्र अवघ्या दोनच दिवसात त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच सध्या या पदावर जिल्हाधिकारी असणारे मिलींद बोरीकर यांची पर्यटन विभागात संचालक या पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
याशिवाय अन्य सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जयश्री भोज यांना राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून राज्य पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली आहे. डॉ निरुपमा डांगे यांची सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement