NCP Protest Against Nilesh Rane: निलेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, पोलिसांकडून कारवाई (Watch Video)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याविरोधात आज (9 जून) मुंबई येथे निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुनला थेट औरंगजेब बादशाहसोबत केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याविरोधात आज (9 जून) मुंबई येथे निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या ट्विटरुन राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांचे बंधून आमदार नितेश राणे यांनी मात्र निलेश राणे यांच्या ट्विट पोस्टला अप्रत्यक्ष समर्थन दिले आहे. निलेश राणे हे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जबादारीनेच ट्विट केले असेल , असे विधान नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)