पुण्यात Mahatma Jyotirao Phule Market Yard भागात जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण; सोहळ्याला शरद पवार-छगन भुजबळ एकत्र (Watch Video)
आज सावित्रीबाई फुले यांच्या194 वी जयंती आहे.
पुण्यामध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड मध्ये जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. या सोहळ्याला शरद पवार-छगन भुजबळ एकत्र पहायला मिळाले आहेत. पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले तर या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ होते. त्यांच्यामध्ये काही काळ संवादही झाला. दरम्यान छगन भुजबळ हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर मागील विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)