Viral Video: NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण; रोहित पवारांकडून घटनेची चौकशी करण्याची मागणी

या घटनेची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.

NCC students Viral Video (PC - Twitter)

Viral Video: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेसंदर्भात पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, अशी मारहाण हा प्रशिक्षणचा भाग आहे का? आणि नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच विद्यार्थ्यांना अतिरेक्यांप्रमाणे झालेल्या मारहाणीच्या या घटनेची सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करावी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)