Sameer Wankhede: समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, पत्नी क्रांती रेडकरने दिली माहिती

धमकीप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं.

Sameer Wankhede (PC - ANI)

मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात येत आल्याचं समोर आलं आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमकीप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं. क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमक्या आणि या सगळ्या गोष्टी ट्रोल ज्याला म्हणतो हे खूप आदीपासून येत होतं. ते आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण, आता हे दोन हँडल्स नॅशनल नाहीत, ती इंटरनॅशनल अकाऊंट आहेत, असं त्या म्हणाल्या.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)