Mumbai Crime: मुंबईत 'एनसीबी'ची मोठी कारवाई; 50 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त, 1 कोटीची रोकडही जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.

Mumbai NCB Raid

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तस्करांकडून 50 कोटी किमतीचे 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरीतील अंमली पदार्थ तस्करांचं जाळ उद्ध्वस्त करत तिघांना अटक केली आहे. या तस्करामध्ये एका महिलेचा देखील सामावेश आहे. अंमली पदार्थांसहित एक कोटी २० लाख रुपये आणि सोने देखील जप्त केलं आहे.  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement