Nawab Malik's son-in-law Sameer Khan Car Accident: नवाब मलिक यांचा जावई कार अपघातामध्ये गंभीर जखमी; ICU मध्ये दाखल
कार चालकाने गाडीचा अॅक्सिलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली आणि त्यांना कारने फरफटत नेलं.
नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. त्यांना हॉस्पिटल मध्ये आयसीयू त दाखल केले आहे. दरम्यान समीर खान आणि निलोफर हे दोघं कुर्ला च्या क्रिटी केअर हॉस्पिटल मध्ये रूटीन चेकअपला गेले होते. तेथून घरी परतत असताना चालकाचा गाडीच्या अॅक्सिलेटर वर पाय पडला आणि थार गाडी भिंतीवर आदळली. दरम्यान निलोफर च्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
नवाब मलिकांच्या जावयाचा कार अपघात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)