Navi Mumbai Shri Lord Venkateshwara Temple: उद्योगपती Gautam Singhania यांच्या हस्ते नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी, पहा व्हिडिओ (Watch)
प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसते. अशा भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे.
Navi Mumbai Shri Lord Venkateshwara Temple: नवी मुंबईच्या सेक्टर 12, नोडे उलवे या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात तिरूमला तिरुपती देवस्थानाचे श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिर उभा राहत आहे. या आधी जून 2023 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. आता रेमंड लिमिटेडचे सीएमडी गौतम सिंघानिया यांनी बुधवारी या भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी केली. प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसते. अशा भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. आजच्या पायाभरणी सोहळ्यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव, टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, आयआरएस, व्यंकय्या चौधरी उपस्थित होते. (हेही वाचा: Tirupati Temple Trust Assets: अबब! 10 टन सोने, 15,900 कोटी रोख रक्कम; तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने जाहीर केली संपत्ती)
नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)