Parked Cars Catched Fire: पार्क केलेल्या दोन कारला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोपरखैरणे येथील घटना
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Parked Cars Catched Fire: कोपरखैरणे येथे रविवारी रात्री दोन गाड्यांना अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. या आगीचे लोळ परिसरात पसरले होते. नागरिकांना आगीची माहिती मिळताच, घटनास्थळापासून दूर झाले. आगीमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सेक्टर 19 मध्ये रात्रीच्या साडेअकरा वाजता एका कारला आग लागली. जवळच्या कारने देखील पेट घेतला. आगीमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने संभाव्य अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)