Nashik Shocker: व्हॅनमधून लुटले तब्बल 3 कोटींचे सोने चांदी, नाशिक येथील घटना

नाशिक जिल्ह्यातील माणिक खांब शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावर एका व्हॅनमधून तब्बल ३.६७ कोटी रुपयांचे ४.५ किलो सोने आणि १३५ किलो चांदी चोरली आहे

Van looted PC Twitter

Nashik Shocker:  नाशिक जिल्ह्यातील माणिक खांब शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावर एका व्हॅनमधून तब्बल  3.67 कोटी रुपयांचे 4.5 किलो सोने आणि 135 किलो चांदी चोरली आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मुंबईतील काळबादेवी येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची व्हॅन मुंबईहून नाशिककडे सोन्या- चांदिचे पार्सल घेऊन जात होती. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी व्हॅन अडवली आणि व्हॅनमधील प्रवाशांना आणि चालकावंर मिरचीपूड फेकून त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement