Nashik Phata to Khed Elevated Corridor: पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा-खेड हाय-स्पीड कॉरिडॉरला केंद्राकडून मंजुरी; जाणून घ्या होणारे फायदे
यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.
Nashik Phata to Khed Elevated Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. यामध्ये पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरचा समावेश आहे.
पुण्याजवळ नाशिक फाटा ते खेड दरम्यान 30-किमीचा 8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंच्या 2 पदरी सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6 पदरी रस्त्यात रूपांतर करण्यासह सिंगल पिलरवर टियर-1 वर 8 पदरी उन्नत उड्डाणपूल महाराष्ट्र राज्यातील NH-60 च्या खंड (Pkg-1: from km 12.190 to km 28.925 & Pkg-2: from km 28.925 to km 42.113) वर बांधण्यात येईल. (हेही वाचा: Rental Income Rise In Indian Cities: भारतातील प्रमुख शहरांमध्ये भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय वाढ- अहवाल)
पहा पोस्ट-