Narayan Rane On Swami Prasad Maurya: स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर नारायण राणे यांची टीका, म्हणाले 'अशी व्यक्ती भारताची नागरिक असू शकत नाही'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर टीका केली आहे. असा व्यक्ती भारताचा नागरिक असू शकत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. मौर्य यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दल भाष्य केले होते.

Narayan Rane | (Photo Credits: ANI/X)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर टीका केली आहे. असा व्यक्ती भारताचा नागरिक असू शकत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. मौर्य यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दल भाष्य केले होते. ज्यावरुन वाद निर्माण झाला होता. तोच धाका पकडत राणे यांनी टीका केली आहे. मौर्य यांनी सोमवारी जंतरमंतरवर बहुजन समाज हक्क परिषदेला संबोधित करताना हिंदू धर्माला फसवणूक म्हटले होते. ते म्हणाले, हिंदू धर्म ही एक प्रकारची फसवणूक आहे. RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दोनदा म्हटले आहे की हिंदू नावाचा कोणताही धर्म नसून तो जगण्याचा एक मार्ग आहे. पंतप्रधान मोदींनीही हिंदू धर्म नसल्याचं म्हटलं आहे. हे लोक अशी विधाने करतात तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत परंतु जर स्वामी प्रसाद मौर्य यांनी असेच म्हटले तर त्यामुळे अशांतता निर्माण होते, असे मौर्य यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Narayan Rane हे काय बोलले? म्हणाले 'मी 96 कुळी, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही')

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now