Sindhudurg Lok Sabha Constituency: नारायण राणे पुन्हा मैदानात, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता.
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता. दुसऱ्या बाजूला भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. राणे वगळात भाजपकडेही राऊत यांना टक्कर देईल असा उमेदवार नव्हता. शिंदे गटाने उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाचा विचार केला. मात्र, अखेर युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली.
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)