Nanded Rains: नांदेड मध्ये पावसाची मुसळधार; 12 गावात पुरसदृश्य स्थिती, 1000 जणांना हलवले सुरक्षित ठिकाणी

नांदेड मध्ये मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

नांदेड मध्ये सध्या पावसाची मुसळधार बरसत आहे. सातत्याने कोसळणार्‍या या पावसामुळे अनेक गावामध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये बिलोली मध्ये सुमारे 1000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍याकडून सांगण्यात आली आहे. काल नांदेड मध्ये काही शाळकरी मुलाला पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा देखील वापर करण्यात आला आहे. नक्की वाचा: Maharashtra Rain Updates: पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यात रेड अलर्ट; विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now