Nana Patole On Chitra Wagh: नाना पटोलेंचं चित्रा वाघ यांना उत्तर, माझी प्रतिमा मलीन आणि बदनामी करण्याचा प्रयत्न

ते म्हणाले, आपली प्रतिमा मलीन करणे आणि बदनामीच्या हेतूनेच हे व्हिडिओ पसरवले जात असल्याचे म्हटले आहे.

Nana Patole | (Photo Credit : Facebook)

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. नाना पटोले यांच्याशी साधर्म्य असलेली एक व्यक्ती चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळते आहे. ही व्यक्ती एका हॉटेलसदृश्य इमारतीत बसली आहे. ही व्यक्ती ज्या हॉलेलमध्ये बसली आहे. त्या हॉटेलमध्ये या व्यक्तिच्या कुशीत खुर्चीवर बसलेली एक महिलाही दिसत आहे. पण ही व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ केलेला याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, नाना पटोले यांनी या व्हिडिओद्वारे केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आपली प्रतिमा मलीन करणे आणि बदनामीच्या हेतूनेच हे व्हिडिओ पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif