Nana Patole On Chitra Wagh: नाना पटोलेंचं चित्रा वाघ यांना उत्तर, माझी प्रतिमा मलीन आणि बदनामी करण्याचा प्रयत्न

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला नाना पटोलो यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपली प्रतिमा मलीन करणे आणि बदनामीच्या हेतूनेच हे व्हिडिओ पसरवले जात असल्याचे म्हटले आहे.

Nana Patole On Chitra Wagh: नाना पटोलेंचं चित्रा वाघ यांना उत्तर, माझी प्रतिमा मलीन आणि बदनामी करण्याचा प्रयत्न
Nana Patole | (Photo Credit : Facebook)

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. नाना पटोले यांच्याशी साधर्म्य असलेली एक व्यक्ती चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळते आहे. ही व्यक्ती एका हॉटेलसदृश्य इमारतीत बसली आहे. ही व्यक्ती ज्या हॉलेलमध्ये बसली आहे. त्या हॉटेलमध्ये या व्यक्तिच्या कुशीत खुर्चीवर बसलेली एक महिलाही दिसत आहे. पण ही व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ केलेला याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, नाना पटोले यांनी या व्हिडिओद्वारे केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आपली प्रतिमा मलीन करणे आणि बदनामीच्या हेतूनेच हे व्हिडिओ पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2022 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).