Nagpur: जंक फूड खाल्ल्याबद्दल वडील रागावले; नाराज 19 वर्षीय मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
जंक फूड खाल्ल्याबद्दल तिचे वडील तिला रागावले होते.
महाराष्ट्रातील नागपुरात आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वडील रागावले म्हणून 19 वर्षीय बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA) विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. भूमिका विनोद धनवानी असे या मुलीचे नाव असून ती सिंधी कॉलनीत राहत होती. भूमिका बीबीएची विद्यार्थिनी होती आणि तिला थायरॉईडची समस्या होती. जंक फूड खाल्ल्याबद्दल तिचे वडील तिला रागावले होते. यामुळे नाराज होऊन तिने स्वयंपाकघरात कापडाच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. आज सकाळी तिच्या कुटुंबीयांना ती लटकलेल्या अवस्थेत सापडली. त्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा: Adimali Road Accident: केरळमध्ये तामिळनाडूतील पर्यटकांना घेऊन जाणारे वाहन दरीत कोसळले, तिघांचा मृत्यू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)