Muslim Woman Reaches Ayodhya On Foot: मुंबईची रामभक्त शबनम शेख पायी चालत पोहोचली अयोध्येत; म्हणाली- 'तिन्ही राज्यांचे पोलीस आणि सरकारने केली मदत' (Watch Video)
एक मुस्लिम राम भक्त अयोध्येमध्ये पोहोचली आहे व सध्या ती चर्चेची विषय ठरली आहे. 20 वर्षांची शबनम शेख तब्बल 40 दिवसांच्या पायी प्रवासानंतर अयोध्येमध्ये पोहोचली आहे.
Muslim Girl Travelled to Ayodhya on Foot: अयोध्या येथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक आहेत. दररोज लाखोंच्या संख्येने भक्त अयोध्येत पोहोचत आहेत. आता अशीच एक मुस्लिम राम भक्त अयोध्येमध्ये पोहोचली आहे व सध्या ती चर्चेची विषय ठरली आहे. 20 वर्षांची शबनम शेख तब्बल 40 दिवसांच्या पायी प्रवासानंतर अयोध्येमध्ये पोहोचली आहे. तोंडावर हिजाब आणि जिभेवर जय श्री रामचा नारा घेऊन शबनम 21 डिसेंबर रोजी मुंबईहून पायी अयोध्येसाठी निघाली होती. शबनमने या काळात 1425 किलोमीटरचे अंतर कापले. शबनम शेख हिचे अयोध्येत रामभक्तांनी जोरदार स्वागत केले आहे. अयोध्येत पोहोचलेल्या शबनम शेख हिच्यावर साधू-संतांनी पुष्पवृष्टीदेखील केली आहे.
याबाबत शबनम म्हणते, 'माझा प्रवास अजिबात आव्हानात्मक नव्हता. मी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही इस्लामिक देशात असते ते खूप आव्हानात्मक झाले असते, पण मी भारतात राहते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशी तीन राज्ये पार करून मी इथे (अयोध्या) आलेली आहे. तिन्ही राज्यांचे पोलीस आणि सरकारने मला मदत केली आणि पाठिंबा दिला.'
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)