Mumbra Shocker: ठाण्यातील मुंब्रा येथे तरुणाचा विवाहित महिलेसह तिच्या पतीवर चाकूने हल्ला; लग्नाला नकार दिल्याच्या रागातून घडले कृत्य (Watch Video)
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेनंतर महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली,
ठाण्यातील मुंब्रा येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरूने विवाहित महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर चाकूने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेनंतर महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्याआधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तबस्सुम शेख असे या महिलेचे नाव असून आरोपीचे नाव फरमान निसार शेख आहे. या दोघांचे लग्न ठरले होते, मात्र नंतर तबस्सुमने हे लग्न मोडून इश्तियाक शेख नावाच्या दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. याचाच राग फरमानच्या मनात होता. याच रागातून त्याने तबस्सुम व इश्तियाकवर चाकूने हल्ला केला. सध्या आरोपी फरार आहे. (हेही वाचा: Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगची मालिका सुरूच, बहिणीची छेड काढल्यामुळे भावाने उचलला कोयता)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)