Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आकाश निरभ्र, उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान

मुंबई आणि उपनगरांसाठी पुढचे 24 तास उष्णच राहतील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबत आकाश निरभ्र आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरांतील हवामान अनुक्रमे 35°C आणि 25°C च्या आसपास असेल.

Weather Forecast | (Photo credit: archived, edited, representative image)

पाठिमागील काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. तापमान विशेष वाढत नसले तरी, हवेतील आर्द्रता घटल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहे. परिणामी नागरिकांना उकाडा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळीही उकाडा वाढला असून, यंदा उन्हाळा काहीसा अधिकच असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील हवामान घ्या जाणून

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement