Mumbai Water Stock: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली; धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी 33.90 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा 27 टक्क्यांवर आला आहे.

Photo Credit - X

Mumbai Water Stock : मुंबईकरांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 27 टक्के पाणीसाठी शिल्लक (Mumbai Water Crisis) राहिला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना जून अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा या सात धरणांत पाणीसाठा 27 टक्क्यांपर्यंत आला आहे. उर्ध्व वैतरणा धरणात 36.60 टक्के, तुळशीमध्ये 44.20 टक्के, मध्य वैतरणामध्ये 12.13 टक्के, मोडकसागरमध्ये 24.97 टक्के, भातसामध्ये 26.34 टक्के, तानसामध्ये ४१.८६ टक्के, विहारमध्ये 39.61 साठयाची नोंद झाली आहे. (हेही वाचा :Mumbai Water Cut: मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव, पाणी जपून वापरण्याचे आवाहन )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement