Mumbai Water Cut: मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
उन्हाळ्यात मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही.
लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मुंबईकरांना समस्येचा पाणीबाणीचा (Mumbai Water Issue) सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईत 10 टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू करण्याबाबत मुंबई महापालिकेच्या जलखात्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्तांकडून शिक्कामोर्त झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. (हेही वाचा - No Water Cut In Pune: पुण्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीचं संकट नाही)
उन्हाळ्यात मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही. राखीव पाणीसाठ्याबाबत अद्याप जलसंधारण खात्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे जलखात्याकडून इतर पर्यायी मार्गांचा शोध सुरु आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवून 29 फेब्रुवारी पर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यास अद्याप सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2024 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

