Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात

भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पिसे बंधारा येथील दुरूस्ती कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे येथील बांधावरील गेट मध्ये एक रबरी ब्लाडर अचानक बिघाडला आणि पाणीगळती सुरू झाली.दरम्यान आता दुरूस्तीचं काम झाल्यानंतर आता भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या