Mumbai: विनाकारण वाजणारे हॉर्न, मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबणार; पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी उचलली कठोर पावले

मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत

Traffic Cop Mohd Mohsin Sheikh | (Photo Credits: ANI)

राज तिलक रौशन, पोलीस उपायुक्त, मुंबई वाहतूक पोलीस विभाग, यांनी विनाकारण वाजणारे हॉर्न तसेच मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

दुसरीकडे, मुंबईतील रस्त्यावर जर कोणी वाहनचालक हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल, असा आदेशही पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जारी केला आहे. मुंबईतील वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व लोकांना समजावे आणि नियमांचे पालन करावे यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. वृत्तानुसार, मुंबईतील रस्त्यावर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर एफआयआर अंतर्गत तसेच बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात सांगण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)