Mumbai: भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक संभोग; पोलिसांकडून 45 वर्षीय व्यक्तीला अटक

या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या 25 वर्षीय महिलेला दास हा वीरा देसाई रोड, अंधेरी येथे घृणास्पद कृत्य करताना आढळून आल्याने हा गुन्हा मंगळवारी उघडकीस आला.

Arrest Pixabay

भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी अंधेरीच्या आंबोली पोलिसांनी एका 45 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मितलेश दास असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या 25 वर्षीय महिलेला दास हा वीरा देसाई रोड, अंधेरी येथे घृणास्पद कृत्य करताना आढळून आल्याने हा गुन्हा मंगळवारी उघडकीस आला. तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (कोणत्याही पुरुष, स्त्री किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे कलम 11 (1) (1) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement