Mumbai: शिवाजी नगर येथे भूमिगत गटार साफसफाईचे काम करताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

हे दोघे एका मॅनहोलमध्ये पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोवंडीतील नवीन बस डेपोजवळील 90 फूट रोड, रोड क्रमांक 10 वर ही घटना घडली.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

आज भुयारी गटार सफाईचे काम करताना दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगर येथे घडली. हे दोघे एका मॅनहोलमध्ये पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोवंडीतील नवीन बस डेपोजवळील 90 फूट रोड, रोड क्रमांक 10 वर ही घटना घडली. राजावाडी रुग्णालयातील डॉ. प्रवीण बाबर यांनी या घटनेची माहिती दिली. रामकृष्ण (वय 25) आणि सुधीर दास (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: Mumbai: मुंबईच्या इन्फिनिटी मॉलमधील गेम झोनमध्ये मोठा अपघात; ट्रॅम्पोलिन स्प्रिंग तुटल्यामुळे तरुणाचा पाय फ्रॅक्चर, FIR दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement