Mumbai: कोविड-19 निर्बंधांमुळे टॅक्सी चालकांचे हाल
कोविड-19 निर्बंधांमुळे मुंबई मधील टॅक्सी चालकांचे हाल होत आहेत. काहींना आपल्या भावना एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शेअर केल्या आहेत.
कोविड-19 निर्बंधांमुळे मुंबई मधील टॅक्सी चालकांचे हाल होत आहेत. काहींना आपल्या भावना एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शेअर केल्या आहेत.
आम्हाला प्रवासी सहज मिळत नाहीत. दररोज केवळ 200-300 रुपयांची कमाई होते. कुटुंबासाठी अन्नाची सोय करणेही अवघड होते. मुलांची शालेय फी जमा करू शकत नाही, असे टॅक्सी चालक साकारम यांनी सांगितले आहे.
टॅक्सीमध्ये फक्त 2 व्यक्तींना प्रवासाची परवानगी आहे. ती क्षमता वाढवून 3 केली पाहिजे. याचा व्यवसायावरही परिणाम होत आहे. दिवसाकाठी 500 रुपये कमवणे कठीण झाले आहे. वाहन दुरुस्तीसाठी दरवर्षी आम्ही 30,000- 40,000 रुपये खर्च करतो, असे टॅक्सी चालक के.सी. तिवारी यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)