Mumbai Shocker: शेअर टॅक्सीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले.

Man Masturbates in Taxi Shared by Female College Student (Photo Credits: X/@Manishkamat9)

Man Caught Masturbating In Shared Taxi: मुंबईमधील ग्रँट रोड येथील सोफिया कॉलेजजवळ शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनी तिच्या घरी जात असताना तिच्या शेजारील व्यक्ती वाहनात उघडपणे हस्तमैथुन करत होती. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विद्यार्थिनीने स्वतः कॅप्चर केल्याचे दिसत आहे. त्यानंतर या मुलीने हिंमत दाखवत सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती दिली. याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची दाखल घेत, आवश्यक ती पावले उचलली जातील असे सांगितले आहे. (हेही वाचा: Haryana Shocker: 3 वर्षाच्या मुलीचे आधी अपहरण नंतर बलात्कार करून हत्या; नराधमाला अटक, हरियाणातील घटना)

महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन-

 

View this post on Instagram

 

A post shared by MumbaiInLast24Hrs (@mumbaiinlast24hrs)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)