Mumbai Shocker: शेअर टॅक्सीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले.
Man Caught Masturbating In Shared Taxi: मुंबईमधील ग्रँट रोड येथील सोफिया कॉलेजजवळ शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनी तिच्या घरी जात असताना तिच्या शेजारील व्यक्ती वाहनात उघडपणे हस्तमैथुन करत होती. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विद्यार्थिनीने स्वतः कॅप्चर केल्याचे दिसत आहे. त्यानंतर या मुलीने हिंमत दाखवत सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती दिली. याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची दाखल घेत, आवश्यक ती पावले उचलली जातील असे सांगितले आहे. (हेही वाचा: Haryana Shocker: 3 वर्षाच्या मुलीचे आधी अपहरण नंतर बलात्कार करून हत्या; नराधमाला अटक, हरियाणातील घटना)
महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन-
We have followed you. Please share your contact details in DM.
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) December 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2024 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

