Mumbai Road Rage: अभिनेत्री Sai Tamhankar च्या कारचालकाला मालवणी भागात बेदम मारहाण; FIR दाखल
सई ताम्हणकर सोबत चालक Saddam Mandal हा मागील 6 वर्षांपासून काम करत आहे. त्याने दोनदा हॉर्न वाजवल्याचा आणि गाडी झिगझॅक अंदाजात चालवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हर सोबत मुंबई मध्ये काही तरूणांनी हुल्लडबाजी करत त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 13 ऑगस्टच्या असून या प्रकरणी मालवणी पोलिस स्टेशन मध्ये FIR नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Saddam Mandal सई सोबत मागील 6 वर्ष काम करत होता. त्याने सईला रविवारी रात्री चिंचोळी बंदर मध्ये सोडल्यानंतर हा प्रकार घटल्याचं FPJ च्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)