Mumbai Weather Updates: मुंबई थंडीची हुडहुडी वाढली; यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद!
मुंबईत आज कुलाब्यात 18.8 सेल्सिअस तर सांताक्रुझ मध्ये 16 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये थंडीचं पुन्हा कमबॅक झालं आहे. यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईत आज कुलाब्यात 18.8 सेल्सिअस तर सांताक्रुझ मध्ये 16 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती Mumbai IMD कडून देण्यात आली आहे. मागील काही दिवस उन्हाने हैराण झालेले मुंबईकर आता थंडीचा आनंद घेत आहे. आज सकाळपासून मुंबईच्या हवेत गारवा आहे. नक्की वाचा: Nashik Winter Update: नाशिक मध्ये तापमानात घसरण; निफाड 7.8 अंश सेल्सिअस वर .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)